जियो गिगाची ब्रॉडबॅण्ड सेवा सुरु

शनिवार, 18 ऑगस्ट 2018 (14:59 IST)
रिलायन्सने जियो गिगा फ़ायबरकंपनीच्या माध्यमातून फ़ायबर टू द होम ही ब्रॉडबॅण्ड सेवा १५ ऑगस्टपासून सुरू केली आहे. ग्राहकांनी या सेवेसाठी ऑनलाईन रजिस्टर केल्यास ही सेवा मिळेल. पण ही ऑफर प्रिव्ह्यु ऑफ़र असून याबाबत पुढील माहिती दिवाळीनंतर कळवण्यात येईल.
 
या ऑफरमध्ये ग्राहकांनी रजिस्टर केल्यास त्यांना ९० दिवसांसाठी १०० MBPS एवढ्या इंटरनेटची स्पीड मिळेल. महिन्याला १०० जीबी डेटा ग्राहकांना मिळणार असून यात जियोच्या प्रिमियम ऍपचाही लाभ ग्राहकांना मिळेल. या सेवेसाठी ४५०० रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ग्राहकांना भरावे लागणारे असून ते रिफंड मिळणार आहेत. साधारण केबल नेट लावताना ग्राहकांकडून इन्स्टॉलेशन शुल्क भरावे लागते. या सेवेत कुठलेही इन्स्टॉलेशन शुल्क भरावे लागणार नाही. महिन्याचा १०० जीबीचा डेटा संपला तरी अधिकचा ४० जीबीचा डेटाही मिळणार आहे. सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर कुठल्याही प्रकारचे शुल्क ग्राहकांना भरावे लागणार नाही.
 
ग्राहकांना gigafiber.jio.com या वेबसाईटवर जाऊन गिगा फ़ायबरसाठी रजिस्टर करता येणार आहे. या वेबसाईटरवर संपर्क क्रमांक टाकवा लागेल. (जो जियोचा नसला तरीही चालेल) संपर्क क्रमांक टाकल्यावर ओटीपी येईल आणि ग्राहकाला पत्ता नमूद करावा लागेल. ग्राहकाच्या रहिवासी भागात राहणार्‍या लोकांनी केलेल्या रजिस्टरच्या संख्येवर ग्राहकांना गिगा फायबर सेवा प्रदान करण्यात येणार येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती