पेटीएम, गुगल पे, भीम अॅप वरून फसवणूक, सावध राहा
क्रेडिट आणि डेबिट कार्ड नंबर आणि कार्ड वेरिफेकेशन वॅल्यू (सीव्हीव्ही) आणि वन टाइम पासवर्ड (ओटीपी) विचारून फसवणूक करणार्या चोरट्यांनी आता आपलं लक्ष भीम, गुगल पे आणि पेटीएम अॅपवर केंद्रित केले आहे. नवीन सोयी सुविधा आल्यावर बदमाश त्याचा गैरफायदा घेऊन फसवणूक करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
बोगस ग्राहक बनून दुकानदाराकडून गुगल पे नंबर घेऊन सत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील वारजे येथील रवींद्र सपकाळ यांनी याविरुद्ध फिर्याद दिली आहे. सपकाळ यांचे टायरचे दुकान असून त्यांना टायर विकत घेयचे असून पैसे ऑनलाईन पाठवतो असा फोन आला. त्यांनी गुगल पे नंबर विचारून सांगितले की यावर पे म्हणून मेसेज येईल त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पैसे मिळतील. त्यावर विश्वास ठेवून सपकाळ यांनी पे मेसेजवर क्लिक केले. पैसे येत नसल्याचे म्हणून त्याने चार वेळा पे मेसेज पाठवून क्लिक करायला सांगितले. नंतर हे यशस्वी झाल्यामुळे टायर विक्री झाली नाही. परंतू नंतर खात्यातून सुमारे सत्तर हजार निघाल्याचे त्यांना आढळून आले.