Paytm वर 10 कोटी रुपयांची फसवणूक

ऑनलाईन व्यवहार करणार्‍या अनेक अॅप्सपैकी एक पेटीएमची (Paytm) मध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. घोटाळा उघडकीस आल्यावर कंपनीने अनेक कर्मचार्‍यांना काढले आहे आणि शेकडो विक्रेता आपल्या प्लेटफॉमहून हटवले आहेत. 
 
कंपनीमध्ये कॅशबॅकच्या नावाखाली कमीतकमी 10 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. कंपनीचे प्रमुख विजय शेखर शर्मा यांनी याबाबत माहिती दिली.
 
शर्मा यांनी सांगितले की पेटीएमसारखे प्लॅटफॉर्म, व्यवहार प्रक्रियेसाठी मिळणारी व्यापारी सवलत तसेच, चित्रपट तिकीट विक्रीसारख्या व्यवहारात टक्क्यांप्रमाणे मिळणारा फायदा यातून कमाई करतात. दिवाळीनंतर यामध्ये काही लहान विक्रेत्यांना जास्त कॅशबॅक मिळत असल्याचे कंपनीच्या टीमच्या लक्षात आले. संशय बळावल्याने कंपनीकडून तपशीलात लेखापरीक्षण करण्यात आले. यातून समोर आलेली माहिती धक्कादायक होती. कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी कॅशबॅकच्या नावावर ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम विक्रेत्यांना वाटल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार गेले कित्येक महिने चालू होता. यामध्ये कंपनीची 10 कोटी पेक्षा जास्त फसवणूक झाल्याचे लक्षात आहे.
 
आता आमच्या प्लेटफॉर्मवर केवळ ब्रँड विक्रेता असावे हे सुनिश्चित केले गेले आहे. याने विक्रेत्यांची संख्या कमी होईल परंतू कंज्युमर्सला योग्य पारिस्थितिकी तंत्र मिळू शकेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती