फेसबुकनं याबाबत म्हटलं आहे की, ही गुंतवणूक भारताप्रती आमची वचनबद्धता दर्शवणारी आहे. Jio ने भारतात खूप मोठे बदल घडवले आहेत. त्यामुळे आम्ही देखील आकर्षित झालो. चार वर्षांहून कमी काळात रिलायन्स जिओने 388 मिलियनहून अधिक लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणलं आहे. ही बाब इनोव्हेशन आणि नवीन एंटरप्राइझेसला प्रोत्साहन देणारी आहे. यामुळं जिओच्या माध्यमातून आम्ही भारतात पहिल्यापेक्षा अधिक लोकांशी कनेक्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असं फेसबुकनं म्हटलं आहे.
वर्ष 2016 मध्ये जिओचं लॉन्चिंग झालं. जिओने अवघ्या चार वर्षांमध्येच टेलिकॉम क्षेत्रात आपलं वचर्स्व निर्माण केलं आहे. रिलायन्सनं मोबाईल टेलिकॉमपासून होम ब्रॉडबॅंडपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ई-कॉमर्सचा विस्तार केला आहे. तर दुसरीकडे भारतात फेसबुक आणि त्याच्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचं मोठं जाळं आहे. भारतात फेसबुकचे 400 मिलियन यूझर्स आहेत.