अॅपल ही कंपनी लवकरच भारतात आपलं ऑनलाइन स्टोअर सुरू करणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार अॅपल सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान भारतात आपलं ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याच्या विचारात आहे. पुढील काही महिन्यांमध्ये येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं ऑनलाइन स्टोअर लाँच करण्याचा विचार केला असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या अॅपल भारतात थर्ड पार्टी विक्रेते तसंच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या मोबाइल फोनची विक्री करते. सरकारनं गेल्यावर्षी सिंगल ब्रँड रिटेलला प्रोत्साहन देत थेट परदेशी गुंतवणुकीशी निगडीत मार्गदर्शक सुचनांमध्ये थोडी सुट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कंपन्यांना लोकल सोर्सिंगच्या नियमांमध्ये थोडा दिलासा मिळाला होता.