10 रूपयात उपलब्ध होणार प्ले स्टोरमधील अँप्स

मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (11:03 IST)
गुगलने आपल्या अँप स्टोरमधील अँप्स फक्त दहा रूपयात उपलब्ध करून देण्याची सुविधा देऊ केली आहे. यामुळे भारतात पैसे भरून अँप्स खरेदी करण्याला प्रोत्साहन मिळेल. अँप्स गुगल प्लेकडून वापरकत्र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भारत खूप मोठी वाढ करत आहे. त्यामुळे जास्त प्रतिसाद येण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत, अशी माहिती गुगलचे उत्पादक व्यवस्थापक एलिस्टेअर पॅट यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे.  
 
आमचे जागतिक डेव्हलपरकडून अँप्स तसेच गेम्ससाठी भारतातून किती शुल्क वसूल केले पाहिजे याची कल्पना यावरून आम्हाला येईल असेही पॅट यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. डेव्हलपर्स आपले प्रीमियम उत्पादन तसेच अँप्सची किंमत दहा रुपये ठेवू शकतात. भारतात अँप्स वापरणार्‍यांची संख्या या कमी शुल्कामुळे अजून वाढेल तसेच गुगल प्ले यामुळे अजून चांगले अँप्स बाजारात आणू शकेल असे वक्तव्य पॅट यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा