भारतात लॉन्च झाला जगातील सर्वात स्लिम फोन

मंगळवार, 1 एप्रिल 2014 (11:52 IST)
चिनी कंपनी 'जियोनी'ने आपला जगातील सर्वात स्लिम स्मार्ट फोन भारतात बाजारात सादर केला आहे. गोव्यातील एका इव्हेंटमध्ये 'ईलाइफ एस 5.5' शानदार फोन सादर करण्यात आला. या फोनची किंमत 22 हजार 999 आहे.
 
बार्सिलोना येथे झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये फेब्रवारी महिन्यात प्रदर्शित झालेला जगातील सर्वात स्लीम फोन आता भारतात पुढील महिन्याच्या 27 तारखेला उपलब्ध होणार आहे.
 
'ईलाइफ एस 5.5'ची वैशिष्ट्ये...
> 5.5mmची जाडी असून मेटल फ्रेम.
> वजन 130 ग्रॅम 
> 5 इंचाचा फूल एचडी स्क्रिन, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन 
> 1.7 ऑक्टा कोर प्रोसेसर
> 16 जीबी इंटरनेल स्टोरेज क्षमता
> 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे, एलईडी फ्लॅश
> 5 मेगापिक्सल 95 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा
> सिंगल सीम फोन असून अँड्रॉइड 4.2 जेलीबीनवर आधारित 
> 2300एमएएचची बॅटरी 
> पांढरा, काळा, गुलाबी, निळा आणि पर्पल कलरमध्ये उपलब्ध 
 

वेबदुनिया वर वाचा