फ्रेण्डशिप डे म्हणून साजरा करा फेसबुकचा वर्धापनदिन

फेसबुकचा बारावा वर्धापनदिन म्हणजेच 4 फेब्रुवारी हा दिवस फ्रेण्डशिप डे म्हणून साजरा करा, असं आवाहन फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग याने 150 कोटी फेसबुक यूजर्सना केलं आहे.
 
दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगभरात फ्रेण्डशिप डे म्हणून साजरा केला जातो. मात्र अनेकांचे दुरावलेले मैत्र पुन्हा जोडणारा आणि नवीन मित्र-मैत्रिणी शोधण्यास महत्त्वपूर्ण असणार्‍या फेसबुकचा फाउंडेशन डे मैत्रीदिन म्हणून साजरा व्हावा अशी झुकेरबर्गची इच्छा आहे.
 
जानेवारी 2004 मध्ये मार्क झुकेरबर्गने त्याच्या कॉलेज विद्यार्थ्यांना जोडणारी यंत्रणा म्हणून फेसबुकचं कोडिंग केलं. मात्र 12 वर्षामध्ये मित्र आणि आप्तांशी कनेक्टेड राहण्यासाठी जगभरातील अब्जावधी नागरिकांनी फेसबुकला जवळ केलं. ‘4 फेब्रुवारीला तुम्ही friendsday सेलिब्रेट करण्यासाठी मला जॉईन व्हाल, अशी आशा आहे’ असं मार्कने एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘जर तुमच्या मैत्रीची काही कथा असेल, तर मला कळवा. मला शक्य होईल तितके किस्से वाचायला आवडतील’ असंही मार्क म्हणतो.

वेबदुनिया वर वाचा