फेसबुक पुर्ववत, युजर्सचा जीव भांड्यात

गुरूवार, 19 जून 2014 (17:46 IST)
जगातील सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग वेबसाईट 'फेसबुक' काही काळासाठी डाऊन झाल्याचे युजर्सचा जणू काळजाच ठोका चुकला होता . फेसबुकचे होमपेज आणि इतर पेजेसवर दिसत नव्हते. फेसबुकचे मोबाईल व्हर्जनही या काळात डाऊन झाले होते. त्यावरही हाच मेसेज झळकत होता. आता फेसबुकवरील कामकाज पुर्ववत झाल्याने युजर्सनी अखेर सुटकेचा निःश्वास टाकला.

जवळपास 15 मिनिटे फेसबुक युजर्सना ही समस्या भेडसावत होती. भारतासह इतर देशांमधील युजर्संनाही या समस्येला सामोरे जावे लागल्याचे वृत्त आहे.

वेबदुनिया वर वाचा