पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने IPL च्या या मोसमात या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा सामना केला. आयपीएल 2024 हंगामातील 18 वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने चेन्नईचा सहा गडी राखून पराभव केला. दिल्लीकडून पराभूत झाल्यानंतर आता चेन्नईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने पाच विकेट गमावत 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 16 चेंडू बाकी असताना चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. हैदराबादसाठी एडन मार्करामने 36 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. संघाला अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने वेगवान सुरुवात केली, त्याचा फायदा संघाला झाला. चेन्नईकडून मोईन अलीने दोन बळी घेतले. याआधी चेन्नईचा दिल्ली कॅपिटल्सकडूनही पराभव झाला होता आणि या हंगामात त्याला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.