MI vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा शेवटचा सामना आज मुंबई इंडियन्सशी होणार

शनिवार, 11 मे 2024 (16:58 IST)
आयपीएल 2024 चा 60 वा सामना कोलकाता आणि मुंबई यांच्यात शनिवारी, 11 मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर संध्याकाळी 07.30 पासून खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी 07:00 वाजता होईल.

दोन वेळचा माजी चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स, शनिवारी त्यांच्या घरच्या मैदानावर या हंगामातील शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सशी खेळणार आहे. संघाचे लक्ष आयपीएलच्या प्लेऑफ तिकीट मिळवण्याकडे असणार.दोन वेळा विजेतेपद पटकवणारा कर्णधार गौतम गंभीर संघाचा मार्गदर्शक म्हणून परतल्यावर संघाने चांगली कामगिरी केली असून संघाने आत्तापर्यन्त 11 पैकी आठ सामने जिंकले आहे त्याला टॉप 10 मध्ये जाण्यासाठी आणखी एक विजय मिळवायचा आहे. 
 
 टी-20 फलंदाज फिल सॉल्टसह सुनील नरेनला डावाची सलामी देण्यासाठी गंभीरची खेळी मास्टर स्ट्रोक ठरली असून या दोघांनी पॉवरप्ले मध्ये संघाची चांगली सुरुवात केली आहे. रेनने आतापर्यंत 32 षटकार मारले असून तो अभिषेक शर्मा (35) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.तर इंग्लंडच्या सॉल्टने 429 धावा केल्या आहेत.
मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे .हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स हा या मोसमातून बाहेर पडणारा पहिला संघ होता. गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत करणारी मुंबई आता प्रतिष्ठेसाठी खेळत आहे. 
 
दोन्ही संघांचे संभाव्य 11 खेळाडू
 
कोलकाता नाईट रायडर्स
फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, अनुकुल रॉय , वरुण चक्रवर्ती.
 
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती