आयपीएल 2024 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्स संघाने लखनौला जिंकण्यासाठी 209 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना लखनौचा संघ केवळ 189 धावा करू शकला.
आयपीएल 2024 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे.राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. त्याचे 16 गुण आहेत. चेन्नईचे 13 सामन्यांत 14 गुण आणि सनरायझर्स हैदराबादचे 12 सामन्यांत 14 गुण आहेत.दिल्लीने साखळी फेरीत आपली मोहीम संपवली. त्यांनी सात विजय आणि सात पराभवांसह 14 सामन्यांतून 14 गुणांसह आपली मोहीम पूर्ण केली.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 12 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्याला 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जचा सामना करावा लागणार आहे. हा सामना जिंकणारा संघ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करू शकतो.