आयपीएलच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक किंग खान आणि कर्णधार सौरव गांगुली या दोघांत कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे संघाचे प्रशिक्षक जॉन बुकानन यांनी आज स्पष्ट केले.
ही केवळ प्रसिद्धी माध्यमांनी पसरवलेली अफवा असून त्यात काहीही तथ्य नाही. याउलट, पुराव्याहीन आरोपांमुळे संघातील खेळाडू एकमेकांजवळ आले असून त्यांचे मनोधैर्य कमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.