मुंबई संघाचे नशीब खोटे...

भाषा

मंगळवार, 27 मे 2008 (19:20 IST)
नोएडा येथील 14 वर्षीय आरुषी तलवार आणि नोकर हेमराज या यांचा खून केल्या प्रकरणी आरुषीचे वडील डॉ राजेश तलवारला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सध्या देशात हे प्रकरण बरेच गाजत असून, आरुषी आणि हेमराज यांचे मृतदेह तलवार यांच्या घरी आढळून आले होते. हे खून डॉ तलवारनेच केल्याचा नोएडा पोलिसांचा दावा आहे.

या प्रकरणी त्यांनी तलवार यांना संशयावरून अटक केली होती, त्यांना आज न्यायालयात उभे केले असता मुख्य न्यायाधीश अशोक कुमार सिंह यांनी पोलिसांचे बाजू ऐकून घेत डॉ तलवारला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा