मंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड

WD
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जनी विजय मिळवला. मात्र चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला मात्र संथ गतीने ओव्हर टाकल्याबद्दल दंड भरावा लागला आहे.मॅच संपल्यावर धोनीने दोन ओव्हर्स लेट केल्या असल्याचे लक्षात आले. या सीझनमध्ये पहिल्यांदाच धोनीकडून अशी चूक झाल्याबद्दल त्याला २० हजार डॉलर्सचा दंड भरावा लागला आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला १४ रन्सने हरवले होते. चेन्नईने कोलकात्याला २०१ धावांचे आव्हान उभं केले होते. मात्र कोलकाता नाइट रायडर्सची टीम १८६ धावाच करू शकली. त्यामुळे हा सामना चेन्नईनेच जिंकला होता.

वेबदुनिया वर वाचा