सहाव्या आपीएल ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामन्यात 160 धावांचे विजासाठीचे आव्हान हे योग्य होते. व ते सुरक्षित ठेवता आले असते परंतु अष्टपैलू जॅक कालीस हा जायबंदी झाल्यामुळे तो गोलंदाजी करू शकला नाही. आणि त्याच्या गोलंदाजीच्या गैरहजेरीमुळे आम्हाला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला, असे ऑफस्पिनर सुनील नरीन याने सांगितले. कालीस हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्याची उणीव भासली. हा सामना अटीतटीचा झाला. व आम्ही तो जिंकू शकलो नाही. अशी खंतही त्याने व्यक्त केली. कोलकाता संघाने सात सामन्यात फक्त दोन विजय मिळविले आहेत. पाच पराभव झाले असले तरी आम्हाला अंतिम चार संघात स्थान मिळविण्याची अद्यापि संधी आहे, असेही तो म्हणाला.