गांगुलीचा चांगल्या प्रदर्शनाचा वादा

भाषा

सोमवार, 26 मे 2008 (22:00 IST)
कर्णधार सौरव गांगुलीच्या 86 धावांच्या दमदार खेळानंतर कोलकाता नाइट रायडर्स संघाने अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवून आपल्या प्रेक्षकांना खुश करत पुढील वर्षीच्या इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) स्पर्धेत आमचा संघ चांगले प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.


पंजाब इलेव्हन किंग्जविरूद्धच्या सामन्यात नाइट रायडर्सने तीन गड्यांनी विजय प्राप्त करून स्पर्धेतील विजयी सांगता केली. यंदाच्या स्पर्धेत झालेल्या चुका पु्न्हा होणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ.

आयपीएलमधील आपले आव्हान संपुष्‍टात आल्यावर लवकरच संघाचा मालक शाहरूख खान आणि प्रशिक्षक जॉन बुकानन यांच्याशी चर्चा करून पुढील वर्षाची रणनिती आखली जाईल.

काल झालेल्या सामन्यात शेवटच्या चार-पाच षटकात सामना फिरविला. उमर गुलच्या शानदार खेळाने 11 चेंडूत 24 धावा केल्या. त्याला आक्रमक खेळ करायचे सांगितल्याचे सौरवने सांगितले.

वेबदुनिया वर वाचा