मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले आहे. सूर्यकुमारने शुक्रवारी 12 मे) वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध नाबाद 103 धावांची खेळी केली. त्याने 49 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि सहा षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 210.20 होता. सूर्यकुमारने आपल्या शतकी खेळीत अनेक विक्रम केले.
सूर्यकुमार गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या गुजरातविरुद्ध आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या धावांना मागे टाकले आहे. ऋतुराजने यावर्षी अहमदाबादमध्ये 92 धावांची इनिंग खेळली होती. राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने गेल्या वर्षी कोलकातामध्ये 89 धावा केल्या होत्या. त्याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सच्या व्यंकटेश अय्यरने अहमदाबादमध्ये या मोसमात 83 धावांची खेळी केली.
आयपीएलच्या चालू मोसमात शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा चौथा फलंदाज आहे. त्याच्या आधी सनरायझर्स हैदराबादचा हॅरी ब्रूक, कोलकाता नाईट रायडर्सचा व्यंकटेश अय्यर आणि राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जैस्वाल यांनी शतके झळकावली आहेत