श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार शतक झळकावले. एका वर्षातच त्याने भारतासाठी तिसऱ्यांदा T20 क्रिकेटमध्ये शतक झळकावले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सूर्याचे हे तिसरे शतक होते. या खेळीने त्याने भारताच्या लोकेश राहुल आणि पाकिस्तानच्या बाबर आझमसह अनेक फलंदाजांना मागे टाकले आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. तर, सूर्यकुमार यादवने हा पराक्रम तीनदा केला आहे.
सूर्यकुमार मॅक्सवेल आणि मुनरोच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. झेक प्रजासत्ताकच्या द्विजीनेही आपल्या देशासाठी टी-20 मध्ये तीन शतके झळकावली आहेत, परंतु तो सहयोगी संघाचा भाग आहे.