MI vs RR: राजस्थानने मुंबई इंडियन्सचा 23 धावांनी पराभव केला

शनिवार, 2 एप्रिल 2022 (20:42 IST)
आयपीएलमधील मुंबईच्या विजयाचे खाते शनिवारीही उघडता आले नाही. मुंबईला  सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थानने त्याचा 23 धावांनी पराभव केला. चहलने डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी करत 2 बळी घेतले. राजस्थानच्या बटलरने शतक झळकावून 193 धावा केल्या होत्या.
 
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबईने सुरुवातीलाच रोहित शर्माची विकेट गमावली. इशान आणि टिळक यांनी 81 धावांची भागीदारी केली, पण दोघेही अर्धशतक ठोकल्यानंतर बाद झाले. यानंतर पोलार्डच्या संथ फलंदाजीमुळे संघाला 194 धावांचा पाठलाग करता आला नाही.
 
मुंबईच्या पराभवाला किरॉन पोलार्डच जबाबदार होता. त्याने 24 चेंडूत केवळ 22 धावा केल्या. 13 व्या षटकात पोलार्ड फलंदाजीला आला, त्यावेळी संघाची धावसंख्या 121/3 होती आणि मुंबईची स्थिती चांगली होती. एमआयला शेवटच्या 12 चेंडूत 39 धावा करायच्या होत्या, पण पोलार्डला केवळ 10 धावा करता आल्या. यापूर्वी त्याने गोलंदाज म्हणून 4 षटकात 46 धावा दिल्या होत्या.
 
चहल मुळे रॉयल सामना जिंकला आरआरच्या विजयात युझवेंद्र चहलचा मोठा वाटा होता. या स्टार गोलंदाजाने 4 षटकात 26 धावा देत 2 बळी घेतले. त्याने लागोपाठ दोन चेंडूत टीम डेव्हिड (1) आणि डॅनियल सॅम्स (0) यांचे बळी घेतले. चहलला हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नसली तरी त्याची कामगिरी खूपच प्रभावी होती.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती