कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या पहिल्या सत्रात विजेतेपद पटकावत इतिहास रचला. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (RR) 7 गडी राखून पराभव करून IPL ट्रॉफी जिंकली. यासह हार्दिक पांड्या आयपीएल इतिहासातील तिसरा कर्णधार बनला आहे, ज्याने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याच्याआधी शेन वॉर्न आणि रोहित शर्मा यांनी ही अप्रतिम कामगिरी केली आहे. गुजरातने जेतेपद पटकावल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर आयपीएलला नवा चॅम्पियन मिळाला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 130 धावा केल्या, जे गुजरातने 11 चेंडू शिल्लक असताना तीन गडी गमावून पूर्ण केले. गुजरातकडून कर्णधार हार्दिक 34 आणि शुभमन गिलने नाबाद 45 धावा केल्या. या पराभवामुळे राजस्थानचे तब्बल 14 वर्षांनंतर विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.
राजस्थानकडून मिळालेल्या 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने 9 धावांवर रिद्धिमान साहा (5) याच्या रूपाने पहिली विकेट गमावली. त्यानंतर संघाने 23 धावांवर मॅथ्यू वेडची (8) विकेटही गमावली. यानंतर शुभमन गिल (नाबाद 45) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (34) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 53 चेंडूत 63 धावांची भागीदारी करत गुजरातला अडचणीतून बाहेर काढले. गुजरातच्या 86 धावांवर हार्दिक तिसरा फलंदाज म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. हार्दिकने 30 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार लावले..