IPL 2022: IPL सुरू होण्यापूर्वी लखनौच्या संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे हा वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर

शनिवार, 19 मार्च 2022 (14:06 IST)
आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी लखनौच्या संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड कोपराच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे IPL 2022 मधून बाहेर पडणारे ते इंग्लंडचे   तिसरे खेळाडू आहे. त्याच्याआधी कोलकाताचा अॅलेक्स हेल्स आणि गुजरात टायटन्सचा जेसन रॉय हेही दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. मार्क वुड इंग्लंडकडून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळत असताना त्यांना दुखापत झाली होती. मात्र, लखनौ संघाने त्याच्या जागी एकाही खेळाडूचा समावेश केलेला नाही. 
 
मेगा लिलावात लखनौच्या टीमने 7.5 कोटी रुपयांना वुड विकत घेतला. त्याच्या दुखापतीमुळे लखनौचा संघ मोठ्या संकटात अडकला आहे. मार्क वुड व्यतिरिक्त लखनौमध्ये जेसन होल्डर, मार्कस स्टॉइनिस आणि दुष्मंता चमिरा हे परदेशी खेळाडू आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती