एखाद्याच्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होणं हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. अमेरिकेत सध्या असेच प्रकरण समोर आलं आहे. अमेरिकेच्या मॅरिलँड येथे राहणारी महिला मृत्यूनंतर ४५ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाल्याचं दिसून आलं. सध्या ही घटना सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मृत्यूनंतर कुणाचं जिवंत होणं ही अशक्य अशी गोष्ट आहे. परंतु अमेरिकेतील या प्रकारानं डॉक्टरही हैराण झाले आहेत.
जवळपास अर्धातास कॅथीला सीपीआर देण्यात आला जेव्हा कॅथीला ह्दयविकाराचा झटका आला आणि त्या खाली कोसळल्या तेव्हा तात्काळ उपस्थित डॉक्टरांनी त्या महिलेची चाचणी केली. तेव्हा कॅथीचे पल्स चालत नव्हते आणि त्यांच्या मेंदूलाही ऑक्सिजन मिळत नव्हतं. त्यानंतर डॉक्टरांनी महिलेला अर्ध्यातासाहून जास्त सीपीआर दिला. त्यानंतर अचानक ४५ मिनिटांनी त्यांच्या शरीराने हालचाल करण्यास सुरुवात केली. तेव्हा डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. सुदैवाने कॅथीचा जीव वाचला.
कॅथीने मानले देवाचे आभार या प्रकारानंतर कॅथीने प्रतिक्रिया दिली की, देवाने मला नवं जीवदान दिलं आहे. आयुष्य जगण्यासाठी दुसरी संधी मिळाली आहे. मी देवाचे आभार मानते. माझ्या या नवीन जीवनासाठी मी खूप खुश आहे असं ती म्हणाली. तर घडलेला प्रकार कॅथीच्या मुलीला समजताच तीदेखील आनंदी झाली. माझ्या आईला माझ्या मुलीचा चेहरा बघायचा होता म्हणून तिला नवं आयुष्य मिळालं आहे. मी त्याबद्दल खूप आनंदी आहे असं कॅथीच्या मुलीने सांगितले.