डोनाल्ड ट्रम्प आपल्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल इलॉन मस्क यांना काय म्हणाले?

मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (09:40 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) परतले आहेत. ते सध्या एक्स प्लॅटफॉर्मचे मालक इलॉन मस्क यांना थेट मुलाखत देत आहेत.
 
ही मुलाखत नियोजित वेळेपेक्षा थोड्या उशिराने सुरू झाली. मस्क यांनी यासाठी सायबर हल्ल्यांना जबाबदार धरले. ही एक अनौपचारिक मुलाखत असून, मुक्त विचारांच्या स्वतंत्र मतदारांना मदत करेल, असं मस्क म्हणाले.
 
ट्रम्प यांनी “सर्व रेकॉर्ड ब्रेक केल्याबद्दल” मस्क यांचे आभार मानले. तसेच, मोठ्या संख्येने लोक हा कार्यक्रम ऐकण्यासाठी येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
ॲलन यांनी संवादाची सुरुवात ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हत्येच्या प्रयत्नाच्या घटनेने केली.
 
आपल्या अनुभवाबद्दल तपशीलवार बोलण्यापूर्वी ट्रम्प हसले. ते म्हणाले, “हे अजिबात सुखद नव्हते”.
 
6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिल येथे झालेल्या दंगलीनंतर ट्रम्प यांना एक्सवर (पूर्वीचे ट्विटेर) दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.
 
ही मुलाखत स्क्रिप्टशिवाय असेल आणि कोणत्याही मुद्द्यावर बोलण्यास मर्यादा नसल्याची घोषणा मस्क यांनी केली. हे खूप 'एन्टरटेनिंग' होईल असंही ते म्हणाले.
 
एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि फेसबुकसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःचे ट्रुथ सोशल नामक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच केले. यावर ट्रम्प यांना एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) 88 दशलक्ष लोक फॉलो करतात.
 
कमला हॅरिसबद्दल काय म्हणाले?
या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या (राष्ट्रपती) उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला कमला हॅरिस यांच्यावर टीका केली.
 
ते म्हणाले, हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार बनल्यापासून त्यांनी अशा मुलाखती दिल्या नाहीत, जशा त्या आता देत आहेत.
 
आयर्न डोमवर काय म्हणाले?
इस्रायलची क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आयर्न डोम हे त्यांच्यासाठी नेहमीच संरक्षणात्मक कवच राहिले आहे.
 
ट्रम्प म्हणाले, “इस्रायलकडे आयर्न डोम आहे, मग आमच्याकडे का नाही असू शकत?.”
 
आयर्न डोम हा कमी पल्ल्याच्या शस्त्रांद्वारे होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा आहे. याला इस्रायली कंपन्यांनी 2006 साली अमेरिकेच्या मदतीनं तयार केलं होतं.
 
पुतिन आणि किम जाँग यांच्यावर प्रतिक्रिया
 
ट्रम्प म्हणाले की, ते पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांना ओळखतात.
 
"ते हुशार आहेत. जेव्हा ते (पुतिन आणि किम) कमला आणि झोपेत असलेल्या जो (अध्यक्ष जो बायडन) यांना पाहतात तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नाही."
 
बायडन यांना जबाबदार धरले
 
ट्रम्प म्हणाले, बायडन नसते तर रशियाने युक्रेनवर हल्ला केला नसता. यावर मस्क यांनी ट्रम्प यांना आपण योग्य बोलत असल्याचे म्हणत दुजोरा दिला.
 
“पुतिन यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत आणि ते माझा आदर करतात.” आपण पुतीन यांच्याशी वेळोवेळी बोलत असचंही ट्रम्प यांनी सांगितलं. ट्रम्प यांनी दावा केला की, “तो देश (युक्रेन) त्यांच्यासाठी (पुतिन) खूप खास होता. मी त्यांना असे करू नका असं सांगितलं होतं”.

Published By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती