कोलकाता बलात्कार : तुटलेल्या इअरफोनच्या मदतीनं पोलिसांनी 6 तासांत असा शोधला आरोपी

सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (18:01 IST)
पश्चिम बंगालमधील कोलकात्यातील एका रुग्णालयातील डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एका आरोपीला अटक केलीय.
आरोपीच्या अटकेनंतरही डॉक्टर आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट दिसून येतेय.
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्रिंसिपल डॉ. संदीप घोष यांनी या घटनेनंतर राजीनामा दिला आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने बीबीसी दिलेल्या माहितीनुसार, “सोशल मीडियावर झालेली बदनामी आणि ज्या डॉक्टरला ते आपली मुलगी मानत होते, तिच्या मृत्यूमुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून भविष्यात अशा घटना होणार नाही अशी आशा त्यांना आहे.”
 
या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून देशभरातील शासकीय रुग्णालयात आज (12 ऑगस्ट) विरोध प्रदर्शनाचं आवाहन करण्यात आलंय.
 
या प्रकरणातील आरोपीचा रुग्णालयाशी थेट संबंध नसला, तरी आरोपी रुग्णालयात येत-जात असे.
 
आरोपी कोलकाता पोलिसांबरोबर स्वयंसेवक म्हणून काम करत असे. आवश्यकतेनुसार पोलिसांना मदतही करत असे.
 
कोलकाता पोलिसांनी रविवारी (11 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, "गुन्हा केल्यानंतर आरोपी त्याच्या घरी जाऊन झोपला. झोपेतून उठल्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी गुन्ह्यादरम्यान घातलेले कपडे धुतले."
 
सेमिनार हॉलमध्ये आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह
वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या महिला डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी (9 ऑगस्ट) सकाळी सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. रात्रीचे जेवण करून ती सेमिनार हॉलमध्ये झोपायला गेली होती.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार आणि हत्येची ही घटना रात्री 3 ते पहाटे 6 च्या दरम्यान घडली.
पीटीआय या वृत्तसंस्थेने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं की, घटनास्थळावर असे पुरावे सापडले आहेत, जे हे स्पष्ट करतात की, महिला डॉक्टरची आधी हत्या करून नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
रविवारी (11 ऑगस्ट) कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी तीन दिवसांत दुसऱ्यांदा मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन येथे आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेतली.
आंदोलक डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवाल कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला असून या परिसरात तैनात असलेल्या एका सहायक पोलिस अधिकाऱ्याला निष्काळजीपणामुळे काढून टाकण्यात आलं आहे.
 
रुग्णालय प्रशासनानेही कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना पदावरून काढून टाकलं आहे. ते दोघेही रुग्णालयात कंत्राटावर काम करत होते.
सुरुवातीला पोलिसांनी या घटनेला केवळ हत्येचा गुन्हा म्हणूनच नोंदवलं होतं. मात्र, कुटुंबीयांच्या दबावानंतर त्यात बलात्काराचे कलमही जोडण्यात आले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पीडित मुलीचे वडील म्हणाले, “माझी मुलगी आता कधीच परत येऊ शकणार नाही, पण निदान तपास तरी व्यवस्थित झाला पाहिजे.”
 
आरोपीला कसं पकडलं?
पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती आणि तपास सुरू झाल्यानंतर सहा तासांत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
 
पोलिसांना घटनास्थळी सीसीटीव्ही व्हीडिओव्यतिरिक्त काही पुरावे सापडले होते, जे त्यांना थेट आरोपीपर्यंत घेऊन गेले.
 
घटनास्थळावरून गोळा केलेल्या पुराव्यांच्या मदतीनं पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.
 
सेमिनार हॉलमधून पोलिसांना एक तुटलेला ब्लूटूथ इअरफोन सापडला होता. तो आरोपीच्या फोनशी कनेक्ट झाला.
 
याशिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या इमारतीत प्रवेश करताना दिसत आहे. यावेळी आरोपीने कानात इअरफोन लावले होते. मात्र, जवळपास 40 मिनिटांनी तो रुग्णालयातून बाहेर पडला, तेव्हा त्याच्या कानात इअरफोन नव्हता.
आरोपीने कोलकाता पोलिसांसोबत नागरी स्वयंसेवक (सिव्हिक व्हॉलंटिअर) म्हणून काम करत होता. अनेकदा तो रुग्णालयाबाहेरील पोलीस चौकीत तैनात असायचा.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, याच कारणामुळे आरोपी रुग्णालयात सहज ये-जा करू शकत होता.
रुग्णालयात दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचीही तो देखभाल करायचा.
पोलिसांना घटनास्थळावरून अनेक पुरावे मिळाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.
 
दुसरीकडे, आरोपीला अटक करूनही संतापाची लाट कायम असून शुक्रवारपासून (9 ऑगस्ट) डॉक्टर आणि नर्सचे रुग्णालयाच्या आवारात आंदोलन सुरु आहे.
 
रुग्णालयाच्या आत डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याच्या या प्रकरणाने महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
 
त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याप्रकरणी म्हटलंय की, "मी स्वत: जरी फाशीच्या शिक्षेच्या विरोधात असले, तरी या प्रकरणातील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेला समर्थन आहे."
 
या घटनेची केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी होणार असेल, तर त्यांची याला हरकत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
 
डॉक्टरांचे देशव्यापी आंदोलन
आरजी कर मेडिकल कॉलेज हे पश्चिम बंगालमधील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे.
26 एकरात पसरलेल्या या रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यासाठी 1200 बेड्स आहेत, तर दररोज सरासरी 2500 रुग्ण ओपीडीमध्ये येतात. याशिवाय आपत्कालीन विभागातही दररोज हजाराहून अधिक रुग्ण पोहोचतात.
या मोठ्या रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेनंतर देशभरातील रुग्णालयातील डॉक्टरांना मोठा धक्का बसला आहे.
निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आज (12 ऑगस्ट) देशभरातील अत्यावश्यक नसलेल्या आरोग्य सेवा बंद करण्याची घोषणा केली.
दिल्लीतील सरकारी रुग्णालयांनीही सोमवारपासून (12 ऑगस्ट) बेमुदत संपाची घोषणा केली आहे.
काही रुग्णालयांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, सोमवारपासून (12 ऑगस्ट) ओपीडी, ऑपरेशन थिएटर आणि वॉर्ड ड्युटी बंद राहणार आहे.
आंदोलक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची आणि पीडितेला न्याय देण्याची मागणी करत आहेत.पोलिसांना घटनास्थळावरून अनेक पुरावे मिळाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.
दुसरीकडे, आरोपीला अटक करूनही संतापाची लाट कायम असून शुक्रवारपासून (9 ऑगस्ट) डॉक्टर आणि नर्सचे रुग्णालयाच्या आवारात आंदोलन सुरु आहे.
रुग्णालयाच्या आत डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याच्या या प्रकरणाने महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याप्रकरणी म्हटलंय की, "मी स्वत: जरी फाशीच्या शिक्षेच्या विरोधात असले, तरी या प्रकरणातील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेला समर्थन आहे."
या घटनेची केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी होणार असेल, तर त्यांची याला हरकत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
 
डॉक्टरांचे देशव्यापी आंदोलन
आरजी कर मेडिकल कॉलेज हे पश्चिम बंगालमधील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे.
26 एकरात पसरलेल्या या रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यासाठी 1200 बेड्स आहेत, तर दररोज सरासरी 2500 रुग्ण ओपीडीमध्ये येतात. याशिवाय आपत्कालीन विभागातही दररोज हजाराहून अधिक रुग्ण पोहोचतात.
या मोठ्या रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेनंतर देशभरातील रुग्णालयातील डॉक्टरांना मोठा धक्का बसला आहे.
निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आज (12 ऑगस्ट) देशभरातील अत्यावश्यक नसलेल्या आरोग्य सेवा बंद करण्याची घोषणा केली.
दिल्लीतील सरकारी रुग्णालयांनीही सोमवारपासून (12 ऑगस्ट) बेमुदत संपाची घोषणा केली आहे.
काही रुग्णालयांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, सोमवारपासून (12 ऑगस्ट) ओपीडी, ऑपरेशन थिएटर आणि वॉर्ड ड्युटी बंद राहणार आहे.
आंदोलक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची आणि पीडितेला न्याय देण्याची मागणी करत आहेत.
Published By- Priya Dixit 
 
वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती