बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणावरून हिंसाचार तीव्र झाल्यानंतर शुक्रवारी देशभरात कर्फ्यू लागू करण्यात आला आणि लष्कर तैनात करण्यात आले. पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रेस सचिव नईमुल इस्लाम खान यांनी सांगितले की, देशात कोणत्याही प्रकारच्या रॅली, मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
विद्यार्थी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 52 मृत्यू फक्त राजधानी ढाकामध्ये शुक्रवारी झाले. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. देशात इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद आहेत. 15 वर्षे सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारपुढे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आहे.
अनेक दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याने लष्कर तैनात करावे लागले.इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद आहेत.सरकारने लोकांना मदत करण्यासाठी सैन्य तैनात करण्याचा आणि कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, संचारबंदी तात्काळ लागू करण्यात आली आहे.
भारताने म्हटले आहे. 8,000 विद्यार्थ्यांसह सुमारे 15 हजार भारतीय बांगलादेशात आहेत. सर्वजण सुरक्षित आहेत. आतापर्यंत 405 विद्यार्थी घरी परतले आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.भारतीयांना सुरक्षा सहाय्यासाठी सल्लागार जारी केला आहे.