अमेरिकेचे पाकवर निर्बंध, व्हिसाबंदीचा इशारा

सोमवार, 29 एप्रिल 2019 (12:05 IST)
अर्थव्यवस्था डबघाईला गेली असताना पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिसाबंदी केली जाईल, असा इशारा अेरिकेने दिला आहे. या व्हिसाबंदीची सुरुवात ही पाकच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपासून होईल, असेही अेरिकेने बजावले आहे.
 
व्हिसा संपूनही शेकडो पाकिस्तानी नागरिक अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. या निर्वासित नागरिकांना पाकिस्तानने कायदेशात घेऊन जावे, असे अमेरिकेने कळवले होते. पण पाकिस्तानने निर्वासित झालेल्या अमेरिकेतील आपल्या नागरिकांना परत घेण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेने पाकिस्तानवर निर्बंध घातले आहेत. तसेच पाकिस्तानच्यानागरिकांना व्हिसाबंदी करण्याचा इशारा दिला आहे.
 
व्हिसा संपल्याने अमेरिकेत निर्वासित झालेल्या आपल्या नागरिकांना जे देश परत घेत नाहीत, अशा देशांची यादी अेरिकेने केली आहे. आता पाकिस्तानचाही त्या 10 देशांच्या यादीत समावेश झाला आहे. पण पाकिस्तानच्या बाबतीत अमेरिकेने काहीसे नरमाईचे धोरण घेतले आहे. अमेरिकेतील पाकिस्तानच्या दूतावाससंबंधी कामावर याचा कुठलाही परिणाम  होणार नाही. हा अमेरिका आणि पाकिस्तानमधील सरकारांचा द्वीपक्षीय मुद्दा आहे आणि सध्यातरी अमेरिका अधिक खोलात जाणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती