अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट काही वेळेसाठी डिअॅक्टिव्ह झाले होते. 'ट्विटर'च्या एका छोट्या चुकीमुळे हे घडलं होतं.जवळपास १० मिनिटांनी ते पुन्हा दिसायला लागलं. विशेष म्हणजे, ही गोष्ट अनेकांच्या तेव्हा ध्यानात आली जेव्हा 'ट्विटर'च्यावतीनं एका अधिकृत ट्विट करण्यात आलं.
'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट एका कर्मचाऱ्याच्या छोट्याशा चुकीमुळे डिअॅक्टिव्ह झालं होतं. तब्बल १० मिनिटे हे अकाऊंट बंद होतं. परंतु, ही चूक आता सुधारण्यात आलीय. ही चूक कशी झाली त्याबद्दल आम्ही चौकशी करत आहोत' असं ट्विटरनं म्हटलंय.
ट्विटर कस्टमर सपोर्टमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडून ही चूक झाली होती. त्याचा ट्विटरसोबत हा शेवटचा दिवस होता.