डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्यात पहिल्यांदा बातचीत होणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत करणार आहे. भारतीय वेळेनुसार मंगळवारी  रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास  फोनवरुन बातचीत होणार  आहे. यावेळी दोन्ही देशांमधील वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या 20 जानेवारी रोजी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर व्हाइट हाऊसने मंगळवारी ट्रम्प यांच्या नियोजित कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले. राष्ट्राध्यपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी आतापर्यंत कॅनाडा,मेक्सिको,इस्रायल आणि मिस्र या चार देशांच्या प्रमुख नेत्यांशी बातचीत केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा