उत्तर कोरियाचे (North Korea) सर्वेसर्वा किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्याबाबतचं एक दुर्मीळ दृश्य नुकतंच जगाने पाहिलं. मिलिट्री परेडमध्ये आपल्या देशातील लोकांची जाहीरपणे माफी मागताना दिसले. पण आता या VIDEO (Kim Jong Un video) सोबतच आणखी एक विषय चर्चेत आला आहे. पहिल्यांदाच साऱ्या जगाचे लक्ष गेलं त्याकडे गेलं आहे. हा विषय आहे उत्तर कोरियाने तयार केलेलं ह्वासोंग-16 आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल. (Hwasong-16 intercontinental ballistic missile) हे मिसाईल जगातील सगळ्यात मोठं बॅलिस्टिक मिसाईल आहे असं सांगितलं जात आहे. क्षणार्धात संपूर्ण न्यूयॉर्क शहर बेचिराख करण्याची ताकद या अण्वस्त्रधारी मिसाईलमध्ये आहे.
हे मिसाईलला नष्ट करणं कठीण
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या 'मॉन्स्टर' आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) चा शोध घेणं आणि नष्ट करणं खूपच कठीण जाणार आहे. तसंच मिसाईलविरोधी प्रतिकार रोखण्यासाठी डेकॉय हल्ला करण्यास सुद्धा हे मिसाईल सक्षम आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे जगातलं सर्वांत मोठं रोड-मोबाईल, लिक्विड फ्युएल मिसाईल आहे.