एका अमेरिकन जोडप्याने असेच केले आहे. लग्नादरम्यान त्यांनी अशी एन्ट्री घेतली, जे पाहून सगळे घाबरले आपल्या लग्नात एका नवविवाहित जोडप्याची धक्कादायक आणि धोकादायक एंट्री पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या नवविवाहित जोडप्यानं आपल्या कपड्यानां आग लावून नंतर हा धोकादायक स्टंट करत लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एंट्री घेतली. या जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गॅबे जेसॉप आणि एम्बीर बेबीर दोघेही स्टंट करतात. लग्नाच्या दिवशीही पाहुणे थक्क होतील हे पाहून त्याने काहीतरी करायचे ठरवले. सहसा लग्नात लोकांच्या हातात फुले असतात, आणि ते सर्वांचे अभिवादन करत हसत-हसत फोटो काढत असतात, पण या जोडप्याने तसे केले नाही, आगीशी स्टंट करत लग्नात प्रवेश केला.