ब्रिटनच्या राजघराण्याचा प्रिन्स जॉर्ज दहशतवाद्यांच्या निशशण्यावर?

मंगळवार, 12 डिसेंबर 2017 (10:50 IST)
ब्रिटनच्या शाही घराण्यातील चिमुकला प्रिन्स जॉर्जही आता दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. तुरुंगात कैद दहशतवाद्याने ऑनलाईन चॅट करताना राजपुत्राला जीवे मारण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. लंडनमधील बेस्टमिन्स्टर न्यायालयाच्या निकालानंतर तीन दहशतवाद्यांची रवानगी तुरुंगात झाली आहे. हुस्नैन राशिद, नैमूर झाकारिया रहमान आणि मोहम्मद आकिब इमरान अशी ब्रिटनच्या तुरुंगात बंद असलेल्या 3 दहशतवाद्यांची नावे आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या हत्येचा कट, हाऊनिंग स्ट्रीट गेट्‍सवर हल्ला आणि विविध दहशतवाद्यांच्या कारवाईच्या नियोजना प्रकरणी हे तिघे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यापैकी हुस्नैन राशिद नावाच्या हदशतवाद्याने इतर अतिरेक्यांशी केलेल्या ऑनलाईन चॅटमध्ये प्रिन्स जॉर्जचा फोटो दाखवून त्याला संपवण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे. 
 
आयसिसच्या निशाण्यावर आता थेट ब्रिटिश घराण्यातील चिमुकला प्रिन्स आल्याने ब्रिटनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती