पुन्हा नग्न फोटो छापेल प्लेबॉय

केवळ वयस्क लोकांसाठी छापली जाणारी पत्रिका प्लेबॉयने म्हटले आहे की ती पुन्हा नग्न फोटो छापेल. पत्रिकेचे मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी कूपर हेफनर यांनी ही घोषणा केली. त्यांनी म्हटले की पत्रिकेतून पूर्णपणे नग्नता हटवण्याचा निर्णय चुकीचा होता.
 
हेफनरने ट्विट केले की आता आम्ही आपली ओळख परत करवून देत आहोत की आम्ही कोण आहोत. 26 वर्षीय हेफनर पत्रिकेचे मालक ह्यू हेफनरचे सुपुत्र आहे.
अमेरिकेहून प्रकाशित होणार्‍या या पत्रिकेने मार्च- एप्रिल अंक काढले आहे. यावर मॉडलची फोटो #NakedIsNormal हॅशटॅगसोबत छापली आहे. पत्रिकेच्या या निर्णयाचे अनेक लोकांना स्वागत केले आहे. तसेच काही लोकांप्रमाणे पत्रिकेच्या विक्रीत कमी 
 
आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हेफनरने म्हटले की पत्रिकेत दाखविलेली नग्नता जुनी झाली असा म्हणणारा मी पहिला मनुष्य असेन.
 
त्यांनी म्हटले की नग्नता कधी समस्या नव्हती कारण ही समस्या नव्हेच. प्लेबॉय ची स्थापना 1953 मध्ये झाली असून या पत्रिकेने 2016 पासून नग्न फोटो छापणे बंद केले होते.
 
पत्रिकेच्या मालकांचे म्हणणे आहेत की आता इंटरनेटमुळे नग्नता सामान्य झाली असून अश्या अश्लील पत्रिका आता फायदा कमावतं नाही. एकेकाळी प्लेबॉयच्या 50 लाख 60 हजार प्रती मुद्रित होत होत्या ज्या मागील वर्षी कमी होऊन सात लाख राहिल्या.

वेबदुनिया वर वाचा