दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी (28 डिसेंबर) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत एकूण 11 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.यामुळे केजरीवालांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.
दिल्ली विधानसभेसाठी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर काँग्रेसने आतापर्यंत 47 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.