वृत्तानुसार, अपघातग्रस्त विमानाचे नाव 'बीच बी200 सुपर किंग एअर' आहे, जे नेदरलँड्समधील लेलिस्टॅड शहरासाठी निघणार होते. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडारनुसार, धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळले. विमानात किती लोक होते हे सध्या स्पष्ट झालेले नाही.
स्काय न्यूजनुसार, एसेक्स पोलिसांनी सांगितले की, आम्हाला दुपारी चार वाजता 12 मीटर लांबीचे विमान कोसळल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी लोकांना घटनास्थळाजवळ जाऊ नये अशी विनंती केली आहे, जेणेकरून मदत आणि तपास कार्यात अडथळा येऊ नये.