यावेळी 'डबल मस्ती, डबल अॅक्शन आणि डबल कन्फ्युजन' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अजय देवगणसोबत मृणाल ठाकूर, नीरू बाजवा, रवी किशन, संजय दत्त आणि साहिल मेहता हे चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. त्याच वेळी, दिवंगत अभिनेते मुकुल देव यांची झलक ट्रेलरमध्ये दिसते.
'सन ऑफ सरदार 2' हा चित्रपट विजय कुमार अरोरा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे, एनआर पचिसिया आणि प्रवीण तलरेजा यांनी केली आहे. हा चित्रपट 25 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.