सुत्रांप्रमाणे पाकिस्तानने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यची मागणी केली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतं असा अंदाज असल्याने सर्वच देशांमध्ये सध्या या औषधाला प्रचंड मागणी आहे. याआधी अमेरिका आणि ब्राझीलने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्याची मागणी केली होती.
याआधी इम्रान खान यांनी पाकिस्तानला मदतीचं आवाहन करत एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेंना पाकसाठी काही ठोस मोहीम राबवण्याची मागणी केली होती. यात त्यांनी कर्ज माफीची याचना देखील केली होती.