सोशल डिस्टन्सिंग, आरोग्याच्या सर्वसुविधांची उपलब्धता, खबरदारीचे उपाय, करोनाबाधितांसाठी विलगीकरण कक्ष यामुळे करोना विषाणूचा प्रसार रोखण्यात भारताला मोठ्या प्रमाणात यश येताना दिसते आहे. अनेक आव्हाने आणि संकटे समोर असताना भारताचे खूप चांगल्या पद्धतीने करोनाच्या महासंकटाचा मुकाबला केला आहे, असे त्या म्हणाल्या.