दक्षिण-पूर्व नायजेरियातील बेकायदेशीर तेल रिफायनरी कारखान्यात झालेल्या स्फोटात 100 हून अधिक लोक ठार आणि डझनभर जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. वृत्तनुसार मृतांची संख्या शंभरच्या वर असू शकते. स्फोटामुळे लागलेली आग आजूबाजूच्या मालमत्तेत पसरल्याचे सांगण्यात येत आहे. आयमोचे राज्य माहिती आयुक्त डेक्लन अमेलुम्बा म्हणाले की, आग वेगाने दोन बेकायदेशीर इंधन स्टोअरमध्ये पसरली. स्फोटाचे कारण आणि मृतांचा नेमका आकडा शोधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.