WHO ने फायझरच्या ''पॅक्सलोव्हिड'ला मान्यता दिली

शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (10:35 IST)
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना महामारीच्या उपचारासाठी बहुराष्ट्रीय औषध कंपनी फायझरच्या 'पॅक्सलोव्हिड' गोळीची शिफारस केली आहे. यापूर्वी, रेमडेसिव्हिर आणि मोलानुपिराविरला मान्यता देण्यात आली आहे.
 
WHO ने शुक्रवारी सांगितले की ते फायझरची अँटी-व्हायरल गोळी,'पॅक्सलोव्हिड Paxlovid वापरण्याची शिफारस करते. रुग्णालयात दाखल होण्याचा धोका असलेल्या सौम्य आणि मध्यम कोरोना रुग्णांना ते दिले जाऊ शकते. यासोबतच डब्ल्यूएचओने इशारा दिला आहे की, कोरोनाविरोधी औषधांची उपलब्धता आणि किंमतींमध्ये पारदर्शकतेचा अभाव हे अजूनही मोठे आव्हान आहे. यामुळे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील लोकांना उपचारासाठी पुन्हा रांगेत उभे राहण्यास भाग पाडले जाऊ शकते. 
 
'पॅक्सलोव्हिड टॅब्लेट हे निर्मेटरेल्विर आणि रिटोनावीर टॅब्लेटचे संयोजन आहे. पॅक्सलोविडच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की या गोळीच्या सेवनाने कोरोना रुग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याचा धोका 85 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती