ब्रिटनच्या मंत्रिमंडळात ३ मूळ भारतीय मंत्री

बुधवार, 10 जानेवारी 2018 (16:12 IST)

इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचा जावई ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय.  ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा यांनी मंगळवारी सुएला फर्नांडिस आणि सुनक यांना आपल्या मंत्रिमंडलात सहभागी करून घेण्यात आल्याचं जाहीर केलंय. यामुळे आता ब्रिटनच्या मंत्रिमंडळात मूळ भारतीय असलेल्या मंत्र्यांची संख्या तीनवर गेलीय. ३७ वर्षीय ऋषी सुनक यॉर्कशायरच्या सुरक्षित टोरी मतदारसंघातून २०१५ मध्ये निवडून आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा एकदा त्यांची निवड झाली. त्यांची गृह, समुदाय आणि स्थानिक सरकारच्या मंत्रालयात राज्याचे संसदीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती