समुद्रामध्ये नाव पलटली, 89 लोकांचा बुडून मृत्यू;

शुक्रवार, 5 जुलै 2024 (10:19 IST)
महासागरात नाव पटल्याने 89 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर 70 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहे. बेपत्ता लोकांची जिवंत असल्याची आशा कमी आहे.
 
अफ्रीकी देश मॉरिटानिया मध्ये भीषण अपघात झाला आहे. अटलांटिक महासागर मध्ये प्रवासी मच्छीमारांनी भरलेली नाव पालटली आहे. या घटनेमध्ये आतापर्यन्त 89 लोकांचा मृत्यू झाला आहे. नौसेनाचे जवानांनी 89 लोकांचे मृतदेह शोधून काढले आहे. तर 5 वर्षाच्या मुलीसोबत 9 लोकांचे सुरक्षित रेस्कयू केले गेले. सांगितले जातेआहे की, 6 दिवसांपूर्वी 170 लोक नावेमध्ये बसून मासे पकडण्यासाठी गेले.  
 
ते सेनेगल-गाम्बिया बॉर्डर होत यूरोप जात होते. पण अटलांटिक महासागरमध्ये पाण्याच्या भोवऱ्यात फसले. समुद्र किनाऱ्यापासून कमीतकमी 4 किलोमीटर दूर त्यांची नाव फसली. संकटाचा सिग्नल मिळताच नौसेनेचे जवान तिथे पोहचले. पण तोपर्यंत 89 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. वाचवण्यात आलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर 70 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहे. ज्यांच्या शोध सुरु आहे.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती