अलास्का सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या म्हणण्यानुसार, बेरिंग एअर सिंगल-इंजिन टर्बोप्रॉप विमानाने उनालकलीट येथून नऊ प्रवासी आणि एक पायलटसह उड्डाण केले. अलास्काच्या पश्चिमेकडील प्रमुख शहर नोमजवळ विमानाचा संपर्क तुटला. कोस्ट गार्डने सांगितले की ते नोमच्या आग्नेयेस ३० मैल (48किलोमीटर) अंतरावर बेपत्ता झाले. यानंतर, बचाव कार्य सुरू करण्यात आले आणि काही तासांनंतर त्यांना विमानाचे अवशेष सापडले.