MH370च्या शोधार्थ समुद्रात रोबोट्‍स पाठवणार

मंगळवार, 15 एप्रिल 2014 (11:43 IST)
गेल्या महिन्यापासून बेपत्ता मलेशियन एअरलाइन्सचे विमान MH370च्या शोधार्थ समुद्रात रोबोट्‍स पाठविले जाणार असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या सूत्रांनी सांगितले.


MH370च्या शोधमोहीमेचे नेतृत्त्व ऑस्ट्रेलियन टीम करत आहे. 'द स्टार'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन अधिकारी लवकरच दक्षिण हिंदी समुद्रात रोबोट्‍स पावणार आहे.

क्वालालंपूर येथून उड्‍डान घेतल्यानंतर मलेशियन एअरलाइन्सचे MH370 हे विमान 8 मार्च रोजी बेपत्ता झाले होते. त्यात 227 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्स होते. बेपत्ता बोइंग विमान ‍दक्षिण हिंदी समुद्रात कोसळल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे विमानाचा ढिगारा पर्थपासून 1,670 किलोमीटर अंतरावर समुद्रात असल्याचा दावा शोध मोहिमेच्या अधिकार्‍यांनी केला आहे. विशेष म्हणजे MH370च्या ब्लॅक बॉक्सचे संकेतही मिळत असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

MH370 बेपत्ता झाल्याच्या घटनेला 35 दिवस उलटले आहे. त्यामुळे 'फ्लाइट रेकॉर्डर'ची बॅटरी डिस्चार्ज होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. सोलर ऊर्जेवर चालणारे कॅमेराने परिपूर्ण असणारे रोबोट्स 'ब्लूफिन-21' समुद्रात पाठविण्याची तयारी शोधकर्त्यांनी केली आहे. समुद्रात  रोबोट्स 'ब्लूफिन-21'च्या मदतीने MH370चा ब्लॅक बॉक्स शोधण्यात येणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा