Mexico: मेक्सिकोच्या बारमध्ये गोळीबार, 10 जणांचा मृत्यू

शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (11:02 IST)
मेक्सिकोतील एका बारमध्ये एका व्यक्तीने अचानक गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात किमान 10 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी परिसरांची नाकेबंदी केली आहे.हल्लेखोराने गोळीबार का केला अद्याप कारण समजू शकले नाही. 
 
हा हल्ला का करण्यात आला, तो कोणत्या प्रकारचा होता, याचा खुलासा सध्या झालेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात लोक ओरडताना ऐकू येतात. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला हल्ल्याची माहिती मिळताच आम्ही टीमसह घटनास्थळी पोहोचलो. या गोळीबाराचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
 
ते म्हणाले की, हे टोळीयुद्ध असल्याचे मानले जात आहे. हे सूडाच्या भावनेतून केले गेले. आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. विशेष म्हणजे मे महिन्यातही अशीच एक घटना घडली होती. यामध्ये हल्लेखोराने एका हॉटेलमध्ये गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती