इस्रायली लष्कराने गाझा सीमेला लागून असलेल्या रफाह शहरावरही संपूर्ण ताबा मिळवला असून, युद्धविरामाच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या असून हमासवर इस्रायली लष्कराचा मोठा विजय आहे. मंगळवारी गाझाची सीमा असलेल्या रफाह वर इस्त्राईल टॅंक बिग्रेड गस्त घालताना दिसत आहे. या मुळे लोकांमध्ये घबरहाट पसरली आहे. इस्रायलने आता दक्षिणेकडील गाझा शहरात प्रवेश केला आहे.
या युद्धाला मंगळवारी सात महिने पूर्ण झाले. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युद्धात 34,700 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि गाझा पट्टी उद्ध्वस्त झाली आहे. मंगळवारच्या रफाह ताब्यात घेतल्याने इस्रायलने गाझाच्या सीमेवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
रफाहमध्ये रात्रभर इस्रायली हल्ले आणि बॉम्बफेकीत कमीतकमी सहा महिला आणि पाच मुलांसह किमान 23 पॅलेस्टिनी ठार झाले,दक्षिण इस्रायलवर 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासचा नाश करण्याच्या उद्दिष्टासाठी रफाह ताब्यात घेण्यासाठी आक्रमण महत्त्वपूर्ण असल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. इस्त्रायलने जाहीर केले की ते राफाह ऑपरेशन वाढवतील.