अखेर इस्राइल कंपनीने माफी मागितली

इस्राइलमधील माका ब्रेवरी कंपनीने दारूच्या बाटलीवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटा लावला होता. यावर भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेतला होता. या घटनेची माहिती मिळताच राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी नवी दिल्लीत निषेध केला. इतकेच नव्हे तर या संदर्भात कारवाई करण्याची मागणीही केली. त्यानंतर यासर्व प्रकाराबाबत इस्राइल कंपनीने भारतीयांची भावना दुखवल्या बाबत माफी मागितली आहे. 
 
या प्रकरणावर केरळच्या महात्मा गांधी नॅशनल फाउंडेशनचे चेअरमॅन एबी जे जोसने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली आहे. जोस यांनी रविवारी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनाही पत्र लिहीले. त्यांनी दारू कंपनी आणि त्याच्या मालकाविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. इस्राइलच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या दारू उत्पादनाची निर्मीती करण्यात आली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती