हा रस्ता दिसतो केवळ 2 तास

आपण कधी असा रस्ता बघितला आहे का जो केवळ दोन तास दिसतो? निश्चितच हे ऐकून आपल्या आश्चर्य वाटेल. कदाचित खोटं ही वाटेल पण हे अगदी खरं आहे. केवळ काही वेळा साठी दिसणारा हा रस्ता फ्रान्स येथे आहे. फ्रान्समध्ये असा रस्ता आहे जो केवळ दोन तासासाठी दिसतो आणि वेळ समुद्राच्या पाण्यात बुडलेला असतो.
 
समुद्रात बनलेला हा रस्ता फ्रान्सच्या मुख्य भू-भागाला अटलांटिक कॉस्टवर स्थित नोइरमॉटीयर नावाच्या बेट शी जोडण्यासाठी हा समुद्री मार्ग तयार केला गेला आहे. या रस्त्याची लांबी केवळ पाच किलोमीटर आहे. हा मार्ग पॅसेज डू गोइस या नावाने ओळखला जातो. रस्त्याचे नाव त्याच्या कामाला सार्थक करतं कारण फ्रेंच भाषेत गोइसचा अर्थ आहे जोडे ओले करत रस्ता पार करणे.
 
हा रस्ता पार करणे कठिण आहे कारण दोन तास मार्ग मोकळा असला तरी भरतीमुळे लगेगच पाण्याचं स्तर वाढू लागतं आणि पाणी चार मीटर खोलपर्यंत पोहचतं.

वेबदुनिया वर वाचा