फ्रान्सला इमॅन्युएल मॅकराँ यांच्या रुपात सर्वात तरुण राष्ट्रपती मिळाले

सोमवार, 8 मे 2017 (10:35 IST)

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी इमॅन्युएल मॅकराँ यांची निवड झाली आहे. 39 वर्षीय मॅकराँ हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांचाच विजय होणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. त्यानुसार त्यांनी 80 लाख 50 हजार 245 मतं म्हणजे एकूण मतांच्या 61.3 मतं मिळवत राष्ट्रपती पदाची शर्यत जिंकली. त्यांनी 2004 मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर 2007 मध्ये अर्थमंत्रालयाच्या समित्यांचं काम त्यांनी पाहिलं. 2012 ते 2014 या कालावधीत राष्ट्राध्यक्षांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. नंतर 2014 ते 2016 या काळात ते फ्रान्सचे अर्थमंत्री होते.

 
भारतातूनही मतदान
पुद्दुचेरीतून मतदान – फ्रान्सच्या वसाहती ज्या भागात होत्या, त्या ठिकाणीही मतदान झाले. यात भारताच्या पुद्दुचेरीचा समावेश होता. येथे ४६०० मतदार होते. कराईकल, चेन्नईमध्येही मतदानकेंद्र उभारण्यात आले होते.

वेबदुनिया वर वाचा