लॉस एंजेलिसमध्ये आगीचा धोका अजूनही कायम, ट्रम्प देणार भेट

मंगळवार, 21 जानेवारी 2025 (14:10 IST)
Los Angeles News: लॉस एंजेलिस शहरात आगीने कहर केला आहे आणि सर्व प्रयत्न करूनही ती आटोक्यात आणणे कठीण होत आहे. आगीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. लॉस एंजेलिसमधील जंगलांपासून शहरांपर्यंत पसरलेली आग विनाशकारी ठरली आहे. आग अजून पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे आतापर्यंत एकूण 27 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ता आहे. बेपत्ता लोकांबद्दल कोणताही सुगावा लागलेला नाही. आगीमुळे २२ हजारांहून अधिक घरे जळून खाक झाली आहे. अशी माहिती समोर आली आहे.  
ALSO READ: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या, संतप्त केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली
मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी आधीच धोकादायक भागात इंजिन आणि अग्निशामक तैनात केले आहे. तसेच सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, ते आठवड्याच्या अखेरीस आगीमुळे उद्ध्वस्त झालेल्या भागांना भेट देतील.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती